उत्तरप्रदेशातील देवरियात मुजफ्फपूर सारखे प्रकरण आले उघडकीस

कारवाईत पोलीसांनी केली  बालिका गृहातील 24 मुलींची सुटका

उत्तरप्रदेश – उत्तरप्रदेशातील देवरियात मुजफ्फरपूर सारखी घटना समोर आली आहे. देवरियातील बालिका गृहातून 24 मुलींची सुटका करण्यात आलेली आहे. याप्रकरणी पोलीसांनी 3 जणांना अटक केली आहे.

देवरिया जिल्ह्यातील ‘माॅ विन्ध्यवासिनी महिला प्रशिक्षण आणि सामाजिक सेवा’ संस्थानात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत 42 मुलीपैंकी 24 मुलींची सुटका करण्यात आली आहे. संस्थेची संचालिका, तिचा नवरा आणि मुलगा यांना अटक करण्यात आली आहे.

या बालिकागृहातील एक महिला पळून पोलीस स्टेशनमध्ये आली आणि तिने बालिकागृहातील सर्व गैरप्रकार पोलीसांना सांगितला आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. बालिकागृहात मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप आहे. या संस्थेत चाललेल्या या गैरप्रकारामुळे सीबीआय चौकशी चालू होती आणि त्यामुळे आर्थिक अनुदान बंद करण्यात आले होते. तरीदेखील संचालिका ही संस्था चालवत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)