#ProKabaddi2019 : यु मुंबाची तेलुगु टायटन्सवर मात

हैदराबाद – गचीबावली स्टेडियमवर प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या सातव्या मोसमास शनिवारी प्रारंभ झाला. या स्पर्धेतील पहिल्या लढतीत यु मुंबा संघाने तेलुगु टायटन्सचा 31-25 असा पराभव केला.

यु मुंबा संघाकडून अभिषेकसिंग याने पल्लेदार चढाया करीत 10 गुण वसूल केले. रोहित बालन याने चढाईत 4 गुण मिळविले तर संदीप नरवालने चार पकडी केल्या. तेलुगु संघाकडून रजनीश दलालने चढाईत 8 गुणांची कमाई केली. स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू सिद्धार्थ देसाई याला या सामन्यात फारसा प्रभाव दाखविता आला नाही. त्याला फक्त 5 गुण मिळविता आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)