अटीतटीच्या सामन्यात यु मुंबाने पिछाडीवरून जयपूर पिंक पँथरला चारली धूळ!

प्रो कबड्डी मध्ये आज यु मुंबा आणि जयपूर पिंक पँथर यांच्यात सामना झाला. हा सामना यू मुंबाने ३९-३२ असा जिंकला. यू मुंबा संघातील कोल्हापूरचा खेळाडू सिद्धार्थ देसाई याचे सुपर टेन आणि शेवटच्या मिनिटात यू मुंबाने बदलेले सामन्याचे चित्र हे या सामन्याचे वैशिष्ठ्य ठरले.

पहिल्या सत्रात जयपूर संघाचे वर्चस्व राहिले. त्यांनी डिफेन्स मध्ये चांगली कामगिरी करत यू मुंबावर दबाव निर्माण केला. पहिल्या सत्राला जबरदस्त सुरवात करत जयपूरने १५ मिनिटातच १२-५ अशी आघाडी घेतली होती. परंतु त्यानंतर यू मुंबाने डिफेन्स आणि रेड मध्ये गुण मिळवत पुनरागमन केले. पहिले सत्र संपले तेव्हा जयपूर १५-१३ असे आघाडीवर होते.

-Ads-

दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी डिफेन्सवर अधिक लक्ष दिले. दुसऱ्या सत्रात ९मिनिटांचा खेळ झाला होता तेव्हा जयपूर २३-१८ असे आघाडीत होते. त्यानंतर जयपूर संघ ऑल आऊट झाला आणि सामना २३-२३ असा बरोबरीत आला.

सामना संपण्यास सात मिनिटे बाकी होते तेव्हा गुण संख्या २५-२५ अशी होती. शेवटच्या पाच मिनिटात मुंबा ने जबरदस्त कामगिरी केली आणि सामना ३८-३२  असा आपल्या बाजूने फिरवला आणि शेवटी सामना ३९-३२ असा जिंकला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)