दोन वर्षांची पाणीपट्टी माफ करावी : सुखधान

नेवासे फाटा – गेल्या अनेक दिवसांपासून नेवासे शहराला व्यवस्थित पाणीपुरवठा होत नाही. नागरिकांना पाण्यासाठी पैसे खर्च करावे लागत आहेत. पाणीपट्टीपेक्षा कितीतरी जास्त रक्कम पाण्यावर खर्च करावी लागते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांची पाणीपट्टी नगरपंचायतीने माफ करावी, अशी मागणी नगरसेवक शालिनी सुखधान केली आहे.

गेल्या वर्षी गढूळ पाणीपुरवठ्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केले होते, असे निदर्शनास आणून त्या म्हणाल्या, की नेवासे ग्रामपंचायत अस्तित्वात असताना पाणीयोजनेच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी 49 लाख रुपये आले होते. ठेकेदारांनी दहा टक्के काम करून पैसे काढले. वीजरोहित्र जळणे, पाईपलाइन फुटणे, शुद्धीकरण प्रकल्पावरच्या मोटारीत बिघाड होणे आदी समस्या निर्माण होतात.

-Ads-

आम्ही आंदोलन केल्यानंतर नगरपंचायतीच्या सर्वसाधारणसभेत ठराव करण्यात आला. त्यात ठेकेदाराच्या कामाची चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली; परंतु हा ठराव होऊन नऊ महिने झाले, तरीही काहीच कार्यवाही झालेली नाही. नेवासे शहरात पाईपलाइन फुटणे, रोहित्र जळणे, गढूळ पाणी अशा अनेक समस्या आहेत. नेवासे शहराला सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.

गेल्या एक वर्षभरात नेवासकरांनी पाच हजार रुपयांचे पाणी हे वैयक्तिकरीत्या बाहेरून विकत घेतले आहे. तो खर्च नेवासेकरांना खिशातून करावा लागला आहे. नेवासे नगरपंचायतीची पाणीपट्टी वार्षिक साधारण 1500 रुपये आहे. म्हणजे वार्षिक पाणीपट्टीपेक्षा तिप्पट रक्कम नेवासेकरांची खर्च झाली आहे. त्यामुळे नेवासेकरांची दोन वर्षांची पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणी सुखधान यांनी केली आहे. हा विषय नगरपंचायतीच्या विषयपत्रिकेवर घ्यावा, ठेकेदारावर कारवाई व्हावी, अन्यथा आठ दिवसांत नेवासे नगरपंचायतीसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)