शॉक लागल्याने दोन वायरमन गंभीर जखमी

सातारा
सारासातारा येथील वीज वितरण कंपनीच्या पोवई नाका शाखा नं. येथील दोन वायरमनना विद्युत फिडरवरील हायहोल्टेज विजेचा धक्‍का लागून गंभीर जखमी झाले . सातारा शहरातील खेड या उपनगरात एकनाथ विठ्ठल शिंदे (वय रा. दरे ता. कोरेगाव) व महावीर भरत गुरव (वय रा. सातारारोड ता. कोरेगाव) हे लाईन दुरूस्तीची कामे करत होते.

मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास खेड हद्दीतील एक हॉटेलच्या परिसरात वीज वितरण कंपनीचे दैनंदिन काम सुरू होते .त्यावेळी शिंदे व गुरव हे विद्युत खांबावर चढले होते. अचानक फिडर सप्लायवरील वीज वाहिनीला त्यांचा हात लागल्याने त्यांना विजेचा जोराचा शॉक लागला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. शिंदे यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. दोन्ही जखमी वायरमनवर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)