दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेची दोन लढाऊ जहाजे

वॉशिंग्टन/ बिजींग – वादग्रस्त दक्षिण चीन समुद्राजवळ सोमवारी अमेरिकेने आपली दोन लढाऊ जहाजे सोडली आहेत. दक्षिण चीनच्या वाढत्या सागरी प्राबल्याला आव्हान देण्यासाठी अमेरिकेने उचललेल्या या आव्हानात्मक पावलामुळे चीनने थयथयाट करायला सुरुवात केली आहे. अमेरिका चिथावणी देत असल्याचा आरोप चीनने केला आहे. “युएसएस स्प्रुएन्स’ आणि “युएसएस- प्रेबल’ ही दोन्ही लढाऊ जहाजे दक्षिण चीन समुद्रातील स्पार्टली बेटांपासून 12 सागरी मैलांपर्यंत येऊन ठेपली आहेत. अमेरिकेने आपल्या या कृतीला “सागरी वाहतुकीचे स्वातंत्र्य’ असे नाव दिले आहे.

अमेरिका आणि चीनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून व्यापारी युद्ध सुरु आहे. एकमेकांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्क लावल्यामुळे दोन्ही देशांमध्ये आर्थिक रस्सीखेच सुरु झाली होती. ही तणावाची स्थिती निवळण्यासाठी दोन्ही देशांमध्ये वाटाघाटीही सुरु झाल्या आहेत. 1 मार्चपूर्वी चीनी वस्तूंवर अमेरिकेकडून 200 अब्ज डॉलरचे आयात शुल्क आकारले जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे चीनी वस्तूंवरील आयात शुल्क 10 टक्‍क्‍यांवरून 25 टक्के वाढण्याची शक्‍यता आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभुमीवर अमेरिकेने सागरी हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप चीनने केला आहे.

स्पोर्टली बेटे फिलीपाईन्स, मलेशिया आणि दक्षिण व्हिएतनामच्या किनारपट्टीजवळची वादग्रस्त बेटे आहेत. चीनने तैवान, फिलीपाईन्स, ब्रुनेई, मलेशिया आणि व्हिएतनामपर्यंतच्या संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर हक्क सांगितला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)