भंडाऱ्यात दोन वाघांचा संशयास्पद मृत्यू

विषप्रयोग झाल्याची धक्कादायक बाब तपासाच उघड

भंडारा: भंडाऱ्यातील उमरेड पवनी कराडला या अभयारण्यातील दोन वाघांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या दोन वाघांचा मृत्यू विषप्रयोगाने झाल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे.अभयरण्यातील टी-16 नर आणि टी -4 मादा या वाघिणीचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. मात्र विषप्रयोग करुन या वाघांची शिकार करण्यात आल्याची दुर्दैवी बाब आता समोर आली आहे. दोन्ही वाघांचे शवविच्छेदन करण्यात आले असून प्राथमिक अंदाजनुसार विष पोटात गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची बाब समोर येत आहे.

दोन्ही वाघांच्या मृत्यूस वन विभाग जबाबदार असल्याचा आरोप वन्यजीव प्रेमींनी केला असून संबंधित वनअधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. कधी काळी भंडाऱ्यातील उमरेड पवनी कराडला या अभयारण्याची शान असलेल्या जय वाघाची विशेष ओळख होती. मात्र जय वाघ अचानक गायब झाल्यामुळे वन्यप्रेमी तसेच त्याच्या चाहत्यांची मोठी निराशा झाली होती. मात्र त्यानंतर त्याची जागा शावक जयचंद याने घेतली.

मात्र काही दिवसांपूर्वी तोही बेपत्ता झाल्यामुळे या अभयारण्यात कमी वाघ शिल्लक होते. त्यात टी-16 आणि टी-4 या वाघांच्या मृत्यूने वाघांच्या संख्येत आणखी घट झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)