कोपरगावात धूमस्टाईलने गंठण चोरणारे दोघे गजाआड

नगर – कोपरगाव शहरात धूमस्टाईलने चोरी करणाऱ्यांपैकी दोघांना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी पकडले आहे. सादक शमल इराणी (वय 27), रहीम शहाबुद्दीन मिर्झा (वय 40, रा. नवीन कोर्टात, वार्ड नंबर) या दोघांना अटक करून गुन्हे शाखा पोलिसांनी कोपरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

चंद्रकला प्रकाश दरोडे (रा. आढाव हॉस्पिटल) यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण 18 ऑगस्टला इंदिरापथ रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या चोरांनी चोरून नेले होते. या गंठणची किंमत सुमारे 65 हजार रुपये होती. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती घेतली. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सादक इराणीचे नाव पुढे आले. सादक आणि त्याचे साथीदार हे एसटी बसस्थानक परिसरात येत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहकाऱ्यांनी तिथे सापळा लावला. सादक याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. त्यात त्याने इंदिरापथ रस्त्यावर केलेल्या चोरीची माहिती दिली. चोरीचे दागिने रहीम याला दिल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यानुसार रहिमला देखील ताब्यात घेतले. सादक आणि रहिमला अटक करून कोपरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्यातील तिसरा आरोपी जग्गू युसूफ इराणी ऊर्फ जाकीर (रा. श्रीरामपूर) याचा पोलीस शोध घेत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)