हिंसाचाराचा मार्ग सोडत दोन दहशतवादी शरण 

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमध्ये सक्रिय असणाऱ्या दोन दहशतवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडत शरणागती पत्करली. ती घडामोड दहशतवादग्रस्त पुलवामा जिल्ह्यात घडली. कुटूंबीयांनी मन वळवल्याने ते तरूण दहशतवादाचा त्याग करून मुख्य प्रवाहात सामील झाले. जीविताला धोका निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने त्या तरूणांची ओळख उघड करण्यात आली नाही.

दरम्यान, जम्मू-काश्‍मीरच्या पूँच जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्धवस्त केला. त्या अड्ड्यावरून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला. त्यामध्ये पाकिस्तानी बनावटीच्या चार पिस्तुलांचाही समावेश आहे. त्याशिवाय, पाकिस्तानी चलन, काही खाद्यपदार्थ आणि कपडेही त्या ठिकाणावरून हस्तगत करण्यात आले. सुरक्षा दलांच्या कारवाईवेळी त्या अड्ड्यावर एकही दहशतवादी हजर नव्हता, अशी माहिती सुत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)