काश्‍मीरात दोन दहशतवादी ठार; एक जवान शहीद 

file photo

श्रीनगर  –  जम्मू आणि काश्‍मीरात काही दिवसांपासून दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. या कारवायांना भारतीय जवानांकडून चोख उत्तर देण्यात येत असून सोपोर जिल्ह्यात आज झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले आहे. पण या चकमकीत लान्स नायक ब्रिजेश कुमार हे शहीद झाले आहेत.

जम्मू आणि काश्‍मीरमध्ये सलग दोन दिवस लष्कराकडून शोध मोहिम राबवली जात आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी पुन्हा उत्तर काश्‍मीरच्या सोपोर भागात लष्कराकडून कॉर्डन आणि शोध मोहिम सुरु होती. यावेळी दहशतवाद्यांनी अचानक सुरक्षा रक्षकांवर गोळीबार सुरु केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुत्रांच्या माहितीनुसार, या भागात 4 ते 5 दहशतवादी लपून बसले होते. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर एक जवानही शहीद झाला असून एक गंभीररित्या जखमी झाला आहे. या जवानाला उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय राइफल्स, स्पेशल ऑपरेशंस ग्रुप ऑफ पोलीस (एसओजी) आणि केंद्रिय राखीव पोलीस बल (सीआरपीएफ) हे संयुक्तरित्या ही मोहिम राबवत आहेत.

दरम्यान, गुरुवारी बारामुल्ला जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या जागी झालेल्या चकमकीत सुरक्षा रक्षकांनी 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यावेळी घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणावर शस्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)