उत्तरप्रदेशमधून ‘जैश’च्या दोन दहशतवाद्यांना अटक 

मेरठ – उत्तरप्रदेशस्थित देवबंद येथे एटीएसने छापेमारी करत दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दोघेही जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा सांगण्यात येत आहे. शाहनवाज तेली आणि आकिब अहमद अशी त्यांची नावे आहेत.

माहितीनुसार,  शाहनवाज तेली मूळचा जम्मू-काश्मीरच्या कुलगाममधील आहे. जैश-ए-मोहम्मदच्या इशाऱ्यावर शाहनवाज तेली तेथील स्थानिक युवकांना दहशतवाड्मध्ये भरती केले जात होते. दरम्यान, उत्तरप्रदेश एटीएस पुलवामा हल्ल्यासंदर्भातही शाहनवाजची चौकशी करणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)