लोणावळ्यात दुचाकी अपघातात दोन विद्यार्थी ठार

लोणावळा – पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर लोणावळ्यातील मेपल गार्डनसमोर एक दुचाकी गाडी स्कॉपिओ गाडीला धडकून झालेल्या अपघातात सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकी शाखेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.

सौरभ सेन (मूळ राहणार आसाम) व विपुल कुमार (मूळ किशनगंज बिहार) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. हे दोघेही लोणावळ्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या राजगड हॉस्टेलमध्ये रहात होते. सौरभ आणि विपुल हे दोघेही सिंहगड महविद्यालयात मॅकेनिकलच्या तिसऱ्या वर्षात शिकत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ, विपुल व त्यांचे काही मित्र दुचाकी गाडीवरुन लोणावळ्यातील गवळीवाडा भागातील मॅगीपॉईट येथे जात असताना त्यांची दुचाकीची स्कॉपिओ गाडीला धडक बसल्याने हा अपघात झाला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सौरभ व विपुल या दोघांचाही उपचारापूर्वी मृत्यू झाला. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)