कपड्यावर सवलत दिली नाही म्हणून दोन विक्रेत्यांची हत्या 

वाराणसी – खरेदी केलेल्या कपड्यांवर सवलत न दिल्यामुळे एका व्यक्तीने मॉलमधील दोन सेल्समनची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. वाराणसीमधील मॉलमध्ये झालेल्या या घटनेत अन्य दोन जण जखमी झाल्याचीही माहिती आहे.

संध्याकाळी जेएचव्ही मॉलमधील एका कपड्याच्या दुकानात सामानाची विक्री करणारा सेल्समन आणि खरेदी करण्यासाठी आलेल्या दोघांमध्ये डिस्काउंट न दिल्यामुळे वाद झाला. थोड्याच वेळात हा वाद शिगेला पोहोचला आणि दोघांपैकी एका व्यक्तीने बंदूक काढली आणि दोन जणांवर गोळीबार केला, यामध्ये अन्य दोघंही जखमी झाले. मॉलमध्ये ऐन गर्दीच्या वेळी ही घटना झाल्याने एकच दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे दुकानं लवकरच बंद करण्यात आली आणि मॉल रिकामा करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या घटनेत अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. मात्र, सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेतला जाईल, तसंच त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्यांकडूनही माहिती गोळा केली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृतांची ओळख पटली असून सुनील आणि गोपी अशी त्यांची नावं आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)