कोल्हापुरात पोलिसांच्या खाजगी कारच्या धडकेत दोघे गंभीर जखमी

कोल्हापूर – कोल्हापूरच्या सिद्धार्थनगर कमानीजवळ रविवारी रात्री एका उच्च पोलीस अधिकाऱ्याच्या अंगरक्षकाच्या खाजगी वाहनाने दोघा दुचाकीस्वारांना जोराची धडक दिली. यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रमोद सदाशिव निगडे आणि उमेश तातोबा कांबळे अशी जखमींची नावे आहेत. हे दोघेही रसिद्धार्थनगर परिसरात राहणारे आहेत. या दोघांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र या घटनेनंतर सिद्धार्थनगरातील मोठा जमाव सीपीआरच्या आवारात जमल्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. काही काळ जमावाने सिद्धार्थच्या परिसरात गोंधळही घातला दरम्यान लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सीपीआर पोलीस चौकीत धाव घेतली.

घटनास्थळावरील समजलेल्या माहितीनुसार कोल्हापूरच्या एका उच्च पदस्थ आयपीएस अधिकाऱ्याच्या अंगरक्षक हा सोन्या मारुती चौकाकडून कार घेऊन टाऊन हॉलच्या दिशेने येत होता. त्यावेळी दोघे दोघेजण सिद्धार्थनगर आतून दसरा चौकाकडे निघाले होते. कमानी जवळ आले असता कारणे त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले पण घटनास्थळावरून अपघातग्रस्त दोन्ही वाहने गायब झाल्याचा आरोप जमावाने केला. दोघा जखमींवर कोल्हापूरचा सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असून अपघाताची माहिती घेत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)