लष्कराच्या कारवाईत दोन पाकिस्तानी सैनिक ठार

file photo

श्रीनगर: जम्मू काश्‍मीरच्या नौंगाम सेक्‍टर मध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवरील भारतीय ठाण्यावर हल्ला करण्याचा पाकिस्तानी लष्कराचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला असून या वेळी झालेल्या कारवाईत पाकिस्तानी बाजूचे दोन जण ठार झाले आहेत. ठार झालेले हे दोघेही पाकिस्तानी लष्कराचे जवान असावेत असा अंदाज भारतीय लष्कराच्या सूत्रांनी व्यक्‍त केल आहे.

या घटनेच्या संबंधात माहिती देताना लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की नौगाम सेक्‍टरच्या सीमा ठाण्याच्या नजिक विरळ जंगली भाग आहे. तेथून भारतीय हद्दीवर हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तसेच भारतीय हद्दीत काही जणांना घुसवण्याचा त्यांचा डाव होता. त्यासाठी पाकिस्तानी लष्कराने मोठे कव्हर फायरिंग केले. यावेळी त्यांनी मशिनगन आणि तोफ गोळ्यांचाही मारा केला. त्याला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले त्यात पाकच्याबाजूचे दोन जण ठार झाले. हे त्यांच्या लष्कराचे जवान आहेत असे सांगितले जात आहे. त्यांचे मृतदेह भारतीय जवानांना आढळून आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घुसखोरीच्या प्रयत्नातील अन्य लोक अंधाराचा लाभ घेऊन पळून गेले. यातील काही लोकांनी बीएसएफ जवानांसारखे पोषाख केले होते अशी माहितीही उपलब्ध झाली आहे. भारतीय जवानांना आढळलेले दोन्ही मृतदेह पाकिस्तानने ताब्यात घ्यावेत असे आवाहन त्यांना करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)