कोटा – राजस्थानातील बरन जिल्ह्यात कार्यरत असलेल्या छाब्रा थर्मल पॉवर प्लांट मध्ये उर्जा निर्मीतीची दोन नवीन युनिट स्थापन करण्यात आली असून या दोन युनिट्सचे उद्घाटन आज मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पात त्यामुळे आता वीज निर्मीती करणारी एकूण सहा युनिट्स झाली आहेत.या प्रकल्पाची वीज निर्मीतीची क्षमता आता 2320 मेगावॅट इतकी झाली आहे असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. त्याचा राज्यातील 78 लाख लोकांना लाभ होईल असे ते म्हणाले.
राज्यात मोठ्या प्रमाणात वीज निर्मीती करण्याचा राज्य सरकारचा मनोदय आहे त्यातून उद्योजक, शेतकरी आणि दुर्गम भागातील लोकांना विनाखंड वीज पुरवण्याचा आमचा प्रयत्न आहे असे ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले की केवळ सरकारी प्रकल्पांमधूनच नव्हे तर खासगी प्रकल्पांतूनही मोठ्या प्रमाणावर वीज निर्मीती करण्यास आमचे सरकार प्राधान्य देत आहे.