व्हॉट्सअप घेऊन येत आहे आणखी दोन नवे फीचर्स 

सोशल माध्यमांत सर्वात प्रभावी म्हणून ओळखले जाणारे माध्यम म्हणजे व्हॉट्सअप. भारतात देखील कित्येक जण व्हॉट्सअप हे सोशल माध्यम वापरतात. त्याची संख्या कोटींच्या पटीत आहे. नवयुवकांसमवेत ज्येष्ठ लोक देखील व्हॉट्सअप हे माध्यम वापरत असल्याचे आजकाल सर्रास पाहायला मिळते.

त्यामुळेच व्हॉट्सअप देखील आपल्या युझर्सना दरवेळी नवीन फीचर्स देत असते. याचाच एक भाग म्हणून व्हॉट्सअप आणखी दोन नवे फीचर्स घेऊन येत आहे.

१) फॉरवर्ड इन्फो (Forwarding Info) – या नव्या फीचर मध्ये व्हॉट्सअप वर एखादा मॅसेज किती वेळा फॉरवर्ड झालेला आहे हे कळणार आहे. हे  फीचर जर तुम्हाला चालू करायचे असल्यास संबंधित मेसेज स्वतः पाठवलेला असणे गरजेचे आहे.

२) फ्रिक्वेंटली फॉर्वर्डेड (Frequently Forwarded) – एखादा मेसेज चार पेक्षा जास्त वेळा इत्तर युजर्सना फॉरवर्ड केल्यास त्या मेसेजला ‘Frequently Forwarded’ टॅग असणार आहे. पण या टॅगसहित असलेल्या मेसेजना फॉरवर्ड इन्फो फीचर उपलब्ध नसणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)