पश्‍चिम बंगालमध्ये जमात-उल-मुजाहिद्दिनच्या आणखी दोघांना अटक

कोलकाता – जमात-उल-मुजाहिद्दिन (जेएमबी) संघटनेच्या दोघांना प. बंगालच्या पोलिसांनी मुर्शिदाबाद येथे अटक केली आणि त्यांच्याकडील स्फोटके जप्त केली आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

ही कारवाई कोलकाता पोलिसांची विशेष कृती दल आणि मुर्शिदाबाद पोलिसांनी संयुक्‍तरित्या केली. मोशीबुर रेहमान उर्फ फारूक (वय-35) आणि रुहुल अमिन उर्फ सैफुल्ला (वय-26) हे मंगळवारी रात्री येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या अधारे सापळा रचून या दोघांना अटक करण्यात आली. मोशीबुर व रुहुल हे दोघेही जेएमबी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते असून त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांमध्ये ऍल्युमिनियम पावडर, कॅलेथर आणि सल्फ्युरीक ऍसिड यांचा समावेश आहे असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. 2014 मध्ये वर्धमान जिल्ह्यातील स्फोट प्रकरणी अटकेत असलेल्या कौसर व साज्जाद यांचे हे दोघे जण सहकारी आहेत. कौसर आणि सज्जाद यांना यावर्षी 29 जानेवारी रोजी पकडण्यात आले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2 ऑक्‍टोबर 2014 रोजी वर्धमान जिल्ह्यातील खारघर येथील स्फोटात 2 व्यक्‍तींचा मुत्यू झाला होता. मोशीबुर व रुहुल ऍसिड बॉम्ब बनवण्याचे तंत्र शिकवत असल्याचे सज्जाद यांनी कबूल केले आहे. पोलिसांवर असिड फेकून कौसर याला पोलिसांच्या ताब्यातून सोडवण्याची त्यांचा पुढील कट होता. मात्र, पोलिसांनी मंगळवारी छापा टाकून त्यांचा कट उधळून लावला.

जेएमबीच्या 6 जणांना एका महिन्यात पकडले गेले आहे. अरीफुल इस्लाम अलियस आरिफ (वय-22) याला 16 फेब्रुवारी रोजी बाबुघाट प्रदेशात दहशतवादी कारवाया केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर 3 दिवसांनंतर, आसिफ इक्‍बाल अलियस नदिम (रा. मुर्शिदाबाद), याला हावडा जिल्ह्यातील सांत्रागाची रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली. इस्लाम हा 2018 मध्ये बोधगया येथील स्फोटात सहभागी होता.

जानेवारी 2019 मध्ये बिहारमधील बोधगया येथे पुन्हा एकदा स्फोट करण्यात आला. जेएमबी या संघटनेशी संबंधित असलेले हे सर्वजण पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्याकडील सर्व स्फोटके जप्त करण्यात येऊन त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)