गोव्यातील मगोपचे दोन आमदार भाजपमध्ये; ढवळीकरांचे उपमुख्यमंत्रीपद काढले

पणजी – गोव्यात महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाच्या तीन पैकी दोन आमदारांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांनी मगोप पक्षच भाजप मध्ये विलीन होत असल्याची घोषणा केली पण मगोप पक्षाचे तिसरे आमदार सुदीन ढवळीकर यांनी मात्र भाजपमध्ये प्रवेश न करता आपल्या पक्षाचे अस्तित्व कायम ठेवले आहे त्यामुळे त्यांच्याकडील उपमुख्यमंत्रीपद काढून घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

मनोहर आजगावंकर आणि दीपक पावसकर या दोन आमदारांनी मगोप भाजपत विलीन करून भाजपत प्रवेश केला. यातील आजगांवकर हे पर्यटन मंत्री आहेत. पक्षांतर बंदी कायद्यान्वये दोन तृतीयांश आमदारांमध्ये फूट पडली तरच त्यांचे सदस्यत्व कायम राहते. तीन पैकी दोन सदस्यांनी पक्षच भाजप मध्ये विलीन करण्याची घोषणा केल्यामुळे त्यांच्यावरील पक्षांतर्गत बंदी कायद्यान्वये होणारी कारवाई आता टळणार आहे.

विधानसभेचे सभापती लोबो यांनी त्यांच्या भाजप प्रवेशला मान्यता दिली आहे. त्यामुळे गोवा विधानसभेत भाजपचे संख्या बळ आता 12 वरून 14 इतके झाले आहे. 36 सदस्य असलेल्या विधानसभेत कॉंग्रेसचेही 14 सदस्य आहेत. अन्य पक्ष व अपक्षांनी दिलेल्या पाठिंब्याच्या आधारे भाजपने बहुमत टिकवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)