काश्‍मीरमधील चकमकीत हिज्बुलच्या दोन दहशतवाद्यांचा खातमा 

file photo

एक जण चक्क एम.फिल पदवीधारक

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमध्ये बुधवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खातमा केला. ते हिज्बुल मुजाहिदीन संघटनेचे सदस्य होते. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एक चक्क एम.फिल पदवीधारक होता.
श्रीनगरच्या नौगाम परिसरात दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या शोधासाठी सुरक्षा जवानांनी सकाळच्या सुमारास विशेष मोहीम हाती घेतली.

या मोहिमेवेळी संबंधित परिसरात दडलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा जवानांनी प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यात सबझार अहमद सोफी आणि असिफ अहमद हे दहशतवादी ठार झाले. त्यापैकी 33 वर्षीय सोफी उच्चशिक्षित होता. त्याने एम.फिलबरोबरच एमएससी आणि बी.एड या पदव्या संपादन केल्या होत्या. उच्चशिक्षित तरूणही दहशतवादाच्या मार्गावर जात असल्याच्या काही घटना अलिकडच्या काळात समोर आल्या आहेत. चालू वर्षात सुरक्षा दलांच्या कारवाईत मारला गेलेला सोफी हा तिसरा उच्चशिक्षित तरूण आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, चकमक संपल्यानंतर स्थानिकांच्या एका जमावाने सुरक्षा जवानांवर दगडफेक केली. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये काही काळ संघर्ष झाला. तीन दिवसांपूर्वीच काश्‍मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवादी संघटनांना श्रीनगरमधील कारवाईद्वारे आणखी एक दणका दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)