काश्‍मीरमधील चकमकीत दोन दहशतवादी ठार

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमध्ये शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यात दोन दहशतवादी मारले गेले. श्रीनगरच्या नौगाम परिसरात दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यावरून सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली. त्या मोहिमेवेळी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झडली. त्यात मारल्या गेलेल्या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख तातडीने पटू शकली नाही.

काश्‍मीरमध्ये गुरूवारी दोन ठिकाणी चकमकी झाल्या. त्यात सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांचा खातमा केला. दोन दिवसांत 6 दहशतवाद्यांचा खातमा दहशतवादी संघटनांसाठी मोठाच हादरा मानला जात आहे. मागील महिन्यात जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामात पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने भयंकर हल्ला घडवला. त्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात आणखी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)