हत्यारांची तस्करी करणारे दोघेजण गजाआड 

जयपूर-  हत्यारांच्या दोन संशयित तस्करांना पुलिसांनी पकडले आणि त्यांच्याकडील हत्यारे ताब्यात घेतली. त्यांच्याकडून पाच देशी पिस्तूली हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळले आहे.
या संबंधित प्रकारची माहिती पोलिसांना सीआयडी (सीबी) खात्याच्या माध्यमातून मिळाली होती. मोहम्मद दिलशाद याला एका टीमने व्हीकेआय परिसरातून पकडले त्याच्याकडून त्यांना ३ हत्यारे आणि  एक मोटारसायकल हस्तगत केली. अन्य एका टीमने मोहम्मद जिशान याला पकडले आणि त्याच्याकडून २ बेकायदेशीर हत्यारे मिळवली, अशी माहिती डीसीपी अशोक गुप्ता यांनी दिली.
ते दोघेही पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची विचारपूस चालू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)