मावळच्या दोन प्रतिस्पर्ध्यांचं एकाच मंदिरात, एकाच वेळी साकडं 

पुणे: काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, या सर्वच पक्षांनी यादी जाहीर केल्यानंतर आता शिवसेनेनेही यादी जाहीर केली आहे. शिवसेनेने जाहीर केलेल्या यादीमुळे श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीवर आज शिक्कामोर्तब झाला आहे.

शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पार्थ पवार हे दोघे मावळमधून एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहे. हे दोन प्रतिस्पर्धी आज एकाच मंदिरातर विजयाचं साकडं घालण्यासाठी आमनेसामने आले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निवडणूक म्हंटल की प्रत्येक उमेदवार विजयासाठी देवाला साकडे घालतात. असेचं काहीस चित्र आज, देहूत दिसून आले. तुकाराम बीजनिमित्त आज वारकरी संप्रदाय देहूत जमला होता. तिथेच पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे या दोघांनी एकत्रित येत लोकसभेत यश मिळावं म्हणून तुकोबा चरणी साकडं घातलं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)