दोनशे काश्‍मीरी पंडितांचा पीओके सीमेवर मोर्चा

अनंतनाग: भारतातील शिख भाविकांना पाकिस्तानातील गुरूद्वारा कर्तारपुर येथे जाण्यासाठी जसा कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे तसाच कॉरिडॉर पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरात असलेल्या शारदादेवी मंदिराला भेट देऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठीही तयार करावा या मागणीसाठी आज काही काश्‍मीरी पंडितांनी पीओके सीमेलगत मोर्चा काढला होता. तेथे मंदिरासाठी काही दिवसांपुर्वी कॉरिडॉर उपलब्ध होता परंतु तो नंतर पाकिस्तान सरकारने बंद केला आहे. तो पुन्हा सुरू करण्याची त्यांची मागणी आहे.

प्रत्यक्ष ताबा रेषेनजिक पाक व्याप्त काश्‍मीरात नीलम नदीच्या किनारी शारदा गावात हे शारदा मंदिर आहे आणि ते तेथे बेवारस अवस्थेत आहे. हे मंदिर शारदा पीठ नावाने ओळखले जाते व ते हिंदु भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. ऑल पार्टी मायग्रंट कोऑर्डिनेशन कमिटीतर्फे ही निदर्शने करण्यात आली. या कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की भारताच्याहद्दीतील हिंदुंना तेथे जाण्याची अनुमती मिळावी यासाठी आम्ही गेली 70 वर्षे प्रयत्न करीत आहोत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)