कोल्हापूरात राजकीय वादातून दोन गटांत हाणामारी 

कोल्हापूर – शाहूवाडी तालुक्‍यातील गेळवडे गावात राजकीय वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत आठजण जखमी झाले आहेत. दरम्यान गेळवडे गावात तणाव असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ही तुंबळ हाणामारी बाळकू पाटील आणि सिताराम लाड यांच्या गटात झाली. तलवारी काठ्यांनी वार केल्याने काहीजण गंभीर जखमी झाले आहेत.

बाळकू पाटील, आनंदा पाटील, शरद पाटील याच्या साथीदारांनी हा हल्ला केला. यामध्ये सीताराम लाड, सुभाष पाटील, रुक्‍मिणी लाड हे जखमी झाले. सीताराम लाड यांचा उजवा हात तुटला आहे. त्यांना कोल्हापूर येथील सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

-Ads-

दरम्यान लाड यांच्या समर्थकांनी केलेल्या हल्ल्यात बाळकू पाटील, आनंदा पाटील, शरद पाटील, शिवाजी पाटील, तानाजी पाटील हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मलकापूर येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सीपीआर येथे दाखल केले आहे. या घटनेने सीपीआर येथेही तणावाचे वातावरण असल्याने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)