जिंकलत भावांनो!! शेतकरी भावांचं ‘झिंगाट’ किकी चॅलेंज

मागील काही आठवड्यांपासून इंटरनेटवर ‘किकी चॅलेंज’ नावाच्या ऑनलाईन आव्हानाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. ड्रेक नावाच्या एका रॅप गीतकाराच्या ‘किकी डू यु लव्ह मी?’ या गाण्यावर किकी चॅलेंज अवलंबून आहे. या चॅलेंज मध्ये परफॉर्मरला चालत्या चारचाकी वाहनातून उतरून ‘किकी डू यु लव्ह मी?’ या गाण्यावर थिरकावे लागत असे.
दरम्यान तेलंगणा येथील एका शेतकरी बंधुंनी आपल्या ‘शेतकरी’ स्टाईलमध्ये किकी चॅलेंज पूर्ण करत इंटरनेट वरील तमाम किकी प्रेमींची मने जिंकली आहेत. गिला अनिल कुमार व पिल्ली थिरुपती यांनी इंस्टाग्राम या सोशल मीडियावर अपलोड केलेल्या किकी चॅलेंज व्हिडीओ मध्ये हे दोन शेतकरी बंधू गुढग्यापर्यंत चिखल असलेल्या आपल्या शेतात औताला जुंपलेल्या बैलांमागे किकी चॅलेंज पूर्ण करताना दिसत आहेत.
अभिनेता विवेक ओबेरॉय याने हा व्हिडीओ शेअर केला असून ‘आपण या एकाच किकी चॅलेंजला सुरक्षित मानू शकतो,’ असे म्हंटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)