नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांना काल एका व्यक्तीने रोड शो दरम्यान श्रीमुखात भडकावली. दिल्लीतील मोती नगर भागामध्ये झालेल्या “आप’च्या रोड शो दरम्यान हा प्रकार घडला होता. त्यानंतर आज अरविंद केजरीवाल यांना मारहाण करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Suresh, the man accused of slapping Delhi Chief Minister, Arvind Kejriwal during a roadshow yesterday sent to two-day judicial custody, and also charged under section 107/51 of the CrPC by the Delhi Police.
— ANI (@ANI) May 5, 2019
दरम्यान, रोड शो मध्ये सहभागी होण्यासाठी केजरीवाल उघड्या जीपमध्ये उभे होते. त्याचवेळी या हल्लेखोराने जीपच्या बॉनेटवर चढून केजरीवाल यांच्यावर हल्ला केला. मात्र त्यानंतर लगेचच या हल्लेखोराला “आप’च्या कार्यकर्त्यांनी खाली खेचले. पोलिसांनी त्याला कार्यकर्त्यांच्या तावडीतून सोडवले आणि ताब्यात घेतले. या हल्लेखोराचे नाव सुरेश आहे.