शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद

कोल्हापूर:5 शिवाजी विद्यापीठात “मटेरियल्स व पर्यावरण शास्त्र’ या विषयावर शुक्रवारपासून (दि. 7) दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी दहा वाजता परिषदेचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे. यावेळी कॅनडाच्या लेकहेड विद्यापीठाच्या प्रा. ल्यू ख्रिस्तोफर यांचे बीजभाषण होईल.आंतरविद्याशाखीय अभ्यास आणि संशोधनाला जागतिक स्तरावर अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. मटेरिअल सायन्स आणि पर्यावरणशास्त्र यांचा संयुक्त अभ्यास करण्याच्या आवश्‍यकतेमधून या परिषदेचे आयोजन केले आहे.

सद्यस्थितीत मानवासमोर ऊर्जेच्या निर्मितीपासून ते प्रदूषणापर्यंतचे अनेक प्रश्न उभे आहेत. मानवी अस्तित्वाला आव्हान देणाऱ्या या प्रश्नांना अभिनव व उपयुक्त तंत्रज्ञानाच्या, साधनांच्या निर्मितीमधून उत्तर शोधणे आवश्‍यक आहे. ही परिषद अशा नवतंत्रज्ञानाचा शोध घेणाऱ्या जगभरातील आंतरविद्याशाखीय संशोधक विद्यार्थी, शिक्षक, तंत्रज्ञ, तज्ज्ञ यांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे. तैवान, बांगलादेश, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, सौदी अरेबिया आणि कॅनडा आदी देशांतील सुमारे 350हून अधिक संशोधकांनी परिषदेसाठी ऑनलाईन नावनोंदणी केली आहे. परिषदेसाठी सुमारे 310 शोधनिबंधांचा गोषवारा प्राप्त झाला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)