चीनच्या दोन हेलिकाॅप्टर्सची भारतीय हद्दीत घुसखोरी

file photo

नवी दिल्ली – चीनने पुन्हा एकदा भारतीय हवाई हद्द क्षेत्राचे उल्लंघन केले आहे. एका प्रसिध्द वृत्तसंस्थेनं याचं वृत्त दिलं आहे. चीनच्या दोन हेलिकाॅप्टर ने 27 सप्टेंबर रोजी भारत-चीन नियंत्रण रेषा पार करत भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. ही घुसखोरी लडाख येथे केल्याचे समोर येत आहे.

जवळपास दहा मिनिटं ही हेलिकाॅप्टर्स भारताच्या हवाई हद्दीत घिरट्या घालत होती.  त्यानंतर ती पुन्हा चीनकडे रवाना झाली. याआधीही अनेकदा चीनच्या हेलिकाॅप्टर्सनी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याच्या घटना घडल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मार्चमध्ये चारवेळा चिनी सैन्याची हलिकाॅप्टर्स भारतीय हद्दीत आल्याची माहिती भारतीय गुप्तचर खात्याच्या अहवालातून समोर आली होती. दरम्यान मागील आठवड्यापूर्वी पाकिस्तानकडून जम्मू काश्मीर येथील पूंछमध्ये भारतीय हवाई सीमेवर अशा प्रकराचे उल्लंघन झाले होते. त्यानंतर आता चीनकडून भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचे समोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)