उंब्रज – वराडे, ता. कराड गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर महिंद्रा कार निलगिरीच्या झाडावर आदळली. या भीषण अपघातात दोण ठार व चारजण जखमी झाले आहेत. बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
ऍड. राजकुमार हरि पोळ (वय 46), हरि भाऊ पोळ (वय 64) दोघे सध्या (राहणार नटराज टाकी जवळ मलकापूर ता. कराड), मूळ राहणार अकलूज ता. माळशिरस अशी ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. तर हिना राजकुमार पोळ वय 35, आदित्य राजकुमार पोळ वय 13 राहणार मलकापूर ता.कराड तसेच कार चालक किसन गणपती खापे वय 54 राहणार विरवडे ता. कराड हे जखमी झाले आहेत. जखमींवर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तळबीड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी रात्री पुण्यावरून महिंद्रा के यु व्ही, क्रमांक एम एच 50- 5749 मधून सहाजण प्रवास करीत होते. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास वराडे गावच्या हद्दीत कार आल्यानंतर चालकाचे कारवरील नियत्रंण सुटले व कार रस्त्याकडेच्या निलगिरीच्या झाडावर आदळली . या अपघातात अँड. राजकुमार पोळ हे जागीच ठार झाले. तर हरि भाऊ पोळ हे उपचारादरम्यान मयत झाले. या अपघातात हिना पोळ, आदित्य पोळ वय 13 चालक किसन खापे हे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.