तळेगाव दाभाडेच्या दोन स्वीकृत सदस्यांचा राजीनामा

तळेगाव दाभाडे – येथील नगरपरिषदेचे भारतीय जनता पक्षाचे स्वीकृत सदस्य ऍड. श्रीराम कुबेर व जनसेवा विकास समितीचे स्वीकृत सदस्य सुनील कारंडे यांनी आपल्या स्वीकृत सदस्यपदाचा राजीनामा पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे सादर केला. इतरांना संधी मिळावी यासाठी राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. याप्रसंगी मुख्याधिकारी वैभव आवारे, ज्येष्ठ नगरसेवक सुशील सैंदाणे, माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, नगरसेविका अनिता पवार, शोभा भेगडे, कल्पना भोपळे, विभावरी दाभाडे, हेमलता खळदे, सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.

सभेत ऍड. श्रीराम कुबेर आणि सुनील कारंडे यांनी आपण आपल्या स्वीकृत सदस्य पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी यांचेकडे देणार असल्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे त्यांनी आपला राजीनामा जिल्हाधिकारी,पुणे नवल किशोर राम यांचेकडे सुपूर्द केला. नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, जनसेवा विकास समितीच्या गटनेत्या सुलोचना आवारे आदींच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना कुबेर आणि कारंडे यांनी एक वर्षाच्या कामाचा आढावा व्यक्त केला. पक्षाने दिलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली असून इतर कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून ठरलेल्या वेळेतच राजीनामा दिला असल्याचे सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)