जैशच्या मुख्यालयावरील देखरेखीसाठी पाकिस्तानने नेमले दोन प्रशासक

लाहोर: पाकिस्तानने जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेच्या मुख्यालयावर देखरेख ठेवण्यासाठी दोन प्रशासक नेमले आहेत. लाहोरपासून 430 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बहावलपूरमध्ये जैशचे मुख्यालय आहे.

जैशने 14 फेब्रुवारीला जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या बसला लक्ष्य करून आत्मघाती हल्ला घडवला. त्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवाना शहीद झाले. त्या भयंकर हल्ल्याचा जगभरातून निषेध होत असल्याने पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. त्याशिवाय, जैशवर कठोर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर भारताबरोबरच आंतरराष्ट्रीय समुदायाकडून प्रचंड दबाव टाकला जात आहे. त्या दबावापुढे झुकून पाकिस्तानने नुकतेच जैशचे मुख्यालय ताब्यात घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या सरकारने ती कारवाई केली. आता त्या सरकारने जैशच्या मुख्यालयावरील देखरेखीसाठी दोन प्रशासक नेमले आहेत. जैशच्या मुख्यालयाचे मशीद आणि मदरसा हे दोन प्रमुख घटक आहेत. त्या मशीद आणि मदरशाच्या कामकाजावर ते प्रशासक देखरेख ठेवतील.

जैशचे संबंधित मुख्यालय बहावलपूर शहराच्या हद्दीलगत आहे. तो भाग औद्योगिक वसाहतींनी व्यापलेला आहे. याआधी पाकिस्तानने मशीद आणि मदरशाचा समावेश असलेले ठिकाण जैशचे मुख्यालय नसल्याची भूमिका घेतली होती. मात्र, दबाव वाढल्याने घूूमजाव करून पाकिस्तानने ते जैशचेच मुख्यालय असल्याचे कबूल करत त्याचा ताबा घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)