अभिनेते अनुपम खेर आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्यात रंगले ट्विटरयुद्ध

मुंबई – लोकसभा निवडणुकीमुळे गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत सगळीकडेच राजकीय चर्चा चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. चित्रपट सृष्टीतील कलाकार देखील मनमोकळेपणाने आपले राजकीय विचार सोशल माध्यमांवर जाहीर करत आहेत. अशातच नेहमी ट्विटरच्या माध्यमातून आपली उपस्थिती दर्शवत मत मांडणारे चित्रपट सृष्टीतील दोन कलाकार यांच्यात चांगलेच ट्विट युद्ध सुरु असल्याचे दिसत आहे.

आपल्या ट्विटद्वारे सडेतोड उत्तर देणारी अभिनेत्री स्वरा भास्कर आणि अनुपम खेर यांच्यात हे ट्विट युद्ध सुरु असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी केलेल्या एका ट्विटवर अभिनेत्री स्वरा भास्करने रिट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे. अनुपम खेर यांनी आपल्या ट्विट मध्ये बेगुसराय येथून लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या कन्हैया कुमारवर अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधत जो आपल्या देशाचा होऊ शकला नाही तो तुमचा काय होणार असे म्हंटले होते.

यानंतर, अनुपम खेर यांच्या या ट्विट वर अभिनेत्री स्वरा भास्करने प्रत्युत्तर देत अनुपम खेर यांना टोला मारला आहे. स्वरा भास्करने अनुपम खेर यांचे ट्विट रिट्विट करत, तुम्ही भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या बद्दल बोलत असल्याचा टोमणा मारला आहे. स्वरा भास्करने पुढे लिहीत ज्यांनी दहशतवादी कारवायांद्वारे देश तोडण्याचा प्रयत्न केला ते भोपाळचे किंवा संसदचे कसे होतील असे म्हंटले आहे.

https://twitter.com/ReallySwara/status/1122466547966955527

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)