बिगर बॅंकिंग वित्तसंस्था अडचणीत 

उद्योग महासंघ; आरबीआयने भांडवल पुरवठा करावा

मुंबई – उद्योगांची सर्वात मोठी संघटना सीआयआयने अर्थव्यवस्थेतील मंदीसाठी रिझर्व्ह बॅंकेला जबाबदार ठरविले आहे. स्थिती सुधारण्यासंबंधी सीआयआयने रिझर्व्ह बॅंकेला दहा शिफारशी पाठविल्या आहेत. भारतीय वित्त क्षेत्र बॅंकिंगपुरते मर्यादित नाही. वित्त संस्था (एनबीएफसी), गृह-वित्त संस्था (एचएफसी), पेमेंट्‌स बॅंक्‍स या सर्वांचा त्यात समावेश आहे. यापैकी एक क्षेत्र संकटात आले, तरी त्याचा परिणाम अन्य सर्वच क्षेत्रांवर होतो. आयएल अँड एफएसबाबत हे दिसून आले.

वित्त क्षेत्रात सध्या अस्थिरतेचे वातावरण असून, विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी रिझर्व्ह बॅंकेची आहे. याबाबत बॅंकेने आत्ताच ठोस पावले न उचलल्यास येत्या काळात परिस्थिती आणखी बिघडेल, असे सीआयआयचे म्हणणे आहे.
रिझर्व्ह बॅंकेने 11 सरकारी बॅंकांवर निर्बंध आणल्याने त्यांच्याकडून होणारा कर्जपुरवठा थांबून गृहक्षेत्राला फटका बसला आहे. त्यामुळे आता बॅंकेने किमान गृह-वित्त संस्थांना नॅशनल हाउसिंग बॅंकेमार्फत वित्त पुरवठा करावा, या निर्बंधांच्या पुनर्रचनेबाबत तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा अर्थव्यवस्थेत रोख तरलतेची भीषण समस्या निर्माण होईल, असे सीआयआयने म्हटले आहे.

वित्त क्षेत्राच्या नियमनासाठी रिझर्व्ह बॅंकेखेरीज सेबी, ईर्डा (विमा नियामक प्राधिकरण), पीएफआरडीए (भविष्य निर्वाह निधी प्राधिकरण) या संस्था कार्यरत आहेत, पण या संस्थांचा एकमेकांशी समन्वय नाही. या सर्वांनी एकमेकांसह केंद्र सरकारशीसुद्धा समन्वय साधत वित्त क्षेत्राला बळ द्यावे, असेही सीआयआयने सुचविले आहे. महागाई नियंत्रित करण्याची आवश्‍यकता असते, त्याचबरोबर विकासदर वाढता ठेवणेही गरजेचे असते, असे महासंघाला वाटते.

——————————


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)