पुणे – शिवाजीनगरसह प्रमुख भागांत आज वीज बंद

पुणे – महापारेषणच्या 132 केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीची (टॉवर लाईन) उंची वाढविण्याचे पूर्वनियोजित काम करण्यात येत असल्याने गणेशखिंड येथील महापारेषणच्या 132 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी (दि. 28) सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत शिवाजीनगर, गणेशखिंड, सेनापती बापट रस्ता, फर्गसन रस्ता, बोपोडी, नारायण पेठ, शनिवार पेठ, पाषाण आदी भागातील वीजपुरवठा बंद राहणार आहे.

यामध्ये फर्गसन रस्ता, न.ता. वाडी, मॉडेल कॉलनी, रेंज हिल्स, ईस्क्वेअर, यशोदानगर, अशोकनगर, महालेनगर, वडारवाडी, घोले रोड, मॉर्डन हायस्कूल, पोलीस लाईन, आनंद हौसिंग सोसायटी, सिंम्बायसिस कॉलेज, रेव्हेन्यू कॉलनी, हर्डिकर हॉस्पीटल, संचेती, आकाशवाणी, सिमला ऑफिस, नारायण पेठ, शनिवार पेठ, राजभवन, वाकडेवाडी, खैरेवाडी, ऍग्रीकल्चर कॉलेज, चाफेकर नगर, भोसलेनगर, आयसीएफ कॉलनी, सिंचननगर, मंत्री किशोर पार्क, आपटे रोडचा काही भाग, जंगली रोडचा काही भाग, जिल्हा कोर्ट, तोफखाना, कामगार पुतळा, शिवाजीनगर गावठाण, विश्रामबाग, पत्रकार नगर, गोखलेनगर, जनवाडी, जनता वसाहत, डिफेन्स कॉलनी, कर्वेरोड, एरंडवणा, प्रभात रोड, डेक्कन परिसर, औंध गाव, संघवीनगर इत्यादी भागामध्ये वीजपुरवठा बंद राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)