तुंबाड चित्रपटाची बाॅक्स आॅफिसवर ‘इतक्या’ करोडची कमाई

नवी दिल्ली – सोहम शाह याच्या तुंबाड या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर हळुहळु कमाईच्या बाबतीत जोर पकडणे सुरू केले आहे. चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर रविवारी 1.45 कोटी रूपयांची कमाई केली आहे.

‘तुबाड’ चित्रपटाने याआधी म्हणजेच शुक्रवारी 65 लाख आणि शनिवारी 1.15 कोटी रूपयाची कमाई केली होती. सुरूवातीला कमी कमाई केली असली तरी रविवारी या चित्रपटाने कमाईत जोर पकडल्याचे दिसत आहे. रविवारी 1.45 कोटीचा गल्ला या चित्रपटाने कमावला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चित्रपटाने आतापर्यंत एकूण 3.52 कोटी रूपयांची कमाई केली आहे. तुंबाड या चित्रपटाला प्रेक्षकाकडून जबरदस्त प्रतिक्रिया मिळत आहेत. येत्या आठवड्यात हा चित्रपट चांगली कमाई करेल असे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान बॉलीवुड मध्ये सध्या वेगवेगळ्या धाटणीच्या, आशयाच्या चित्रपटांची चलती आहे. राही अनिल  बर्वे दिग्दर्शित ‘ तुंबाड’  सुद्धा असाच एक हटके  हॉरर चित्रपट आहे. आपण ऐकलेल्या,  वाचलेल्या काल्पनिक दंतकथा  मधील गूढ़ नेहमीच आपले लक्ष वेेधुन घेत एक अनुभूति देते, तीच अनुभूति  ‘ तुंबाड’ मधून आपल्याला मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)