वॉशिंग्टन – अमेरिकेत 2020 मध्ये होणारी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास हिंदू खासदार तुलसी गॅब्बार्ड उत्सुक असल्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकी संसदेवर हवाईमधून निवडून जाणाऱ्या त्या पहिल्या हिंदू सदस्या आहेत.
लॉस एंजेलिसमध्ये नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात प्रसिद्ध भारतीय-अमेरिकी डॉक्टर संपत शिवांगी यांनी तुलसी यांच्याविषयी बोलताना त्या 2020 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षा होऊ शकतात, असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे त्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे. अर्थात, स्वत: तुलसी यांनी अजून त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्या आहेत. मागील आठवड्यातच 37 वर्षीय तुलसी अमेरिकी संसदेचे कनिष्ठ सभागृह असणाऱ्या प्रतिनिधीगृहावर चौथ्यांदा निवडून गेल्या.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
1
0
0