तुलसी गब्बार्ड लढवणार अध्यपदाची निवडणूक

वॉशिंग्टन: मूळ भारतीय वंशाच्या हिंदु अमेरिकन कॉंग्रेस सदस्य तुलसी गब्बार्ड यांनी सन 2020 मधील अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा मनोदय घोषित केला आहे. 37 वर्षीय गब्बार्ड यांनी आज सांगितले की आपल्या उमेदवारीची औपचारीक घोषणा आपण येत्या आठवडाभरात करणार आहोत. त्या चार वेळा अमेरिकेच्या संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार म्हणून विजयी झाल्या आहेत. डेमोक्रॅटिक पक्षातर्फे या आधी एलिझाबेथ वॉरेन यांनीही अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे.

अध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या एकूण बारा जणांनी आत्ता पर्यंत ही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. काल सीएनएन या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तुलसी गब्बार्ड यांनी आपण अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास उत्सुक असून पुढील आठवड्यात आपण आपली अधिकृत घोषणा करू असे त्यांनी म्हटले आहे. पुढच्या पिढीला शुद्ध पाणी, शुद्ध हवा देणे, देशाच्या इमिग्रेशन कायद्यात सुधारणा करणे, नागरीकांना मोफत आणि चांगल्या आरोग्य सुविधा देणे इत्यादी उद्दीष्ठांसाठी आपण अध्यक्षपदाची लढवण्याच्या तयारीत आहोत असे त्यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)