महाराष्ट्रात “त्यांना’ सोबत घेण्याचा प्रयत्न : शरद पवार

नवनाथ बोरकर

डोर्लेवाडी: देशात पर्याय आघाडी न करता राज्यपातळीवर आघाडी करणार. भाजपच्या नंतर दोन नंबरला जो पक्ष असेल त्याला सोबत घेऊन येणाऱ्या निवडणुकीत आघाडी करणार आहे. आघाडीबाबत राज्या-राज्यात ज्या पक्षाचे संख्याबळ जास्त आहे, त्या पक्षाला पहिले स्थान करून आघाडी केली जाईल आणि प्रत्येक राज्यातल्या नेत्यांना विश्‍वासात घेऊन आघाडी करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर सर्वजण एकत्र बसून बहुमत मिळाल्यानंतर कुणी नेतृत्व करायचे हा विषय त्यावेळेस मांडला जाईल, असे शरद पवार यांनी आज (मंगळवारी) गोविंदबाग (बारामतीत) येथे स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मराठा समाजाची फसवणूक?
मराठा समाजाच्या आरक्षणाचा घेतलेला निर्णय फसवणूक केल्या सारखा आहे. आज घटनेला यासंबंधिचे अधिकार आहेत त्या अधिकाराची भूमिका समोर न घेता मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतल्याने न्यायालयामध्ये याचे काय होईल हे सांगता येत नाही. या संबंधी तज्ज्ञ वकिलाशी चर्चा केली. त्यांच्या मते 342 (अ) घटनेच्या तरतुदीमध्ये एखाद्या समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या हे ठरवण्यासंबंधी राष्ट्रपतींना त्या राज्याच्या राज्यपालांना विश्‍वासात घेऊन त्यांच्याकडून प्रस्ताव मागवून मगच आरक्षण ठरवण्याचा अधिकार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने जो निर्णय घेतला त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रपतींनी असे नोटिफिकेशन काढलेले नाही, त्यामुळे 342 प्रमाणे जी तरतूद आहे, त्याची पूर्तता न करता निर्णय घेतला असेल तर त्या निर्णया संबंधी शंका आहे म्हणून एका दृष्टीने मराठा समाजाला आरक्षण देऊन फसवणूक केल्याचे जाणवत आहे. हे माझे मत नसून न्यायालयीन क्षेत्रांमधील जाणकारांचे मत असल्याचे, शरद पवार यांनी स्पष्ट केले.

अधिकच्या जागांची शिवसेनेला संधी
“एनडीएला विरोध नाही आणि भाजपशी माझे भांडण नाही’, “शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवल्याशिवाय आणि दुष्काळाचे प्रश्‍न सोडवल्याशिवाय मला जागाबिगा वाटपात रस नाही’ असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे, त्यामुळे ते शेतकऱ्यांचे प्रश्‍न कसा सोडवतात ते बघायचे आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले. चार राज्यात भाजपचा पराभव झाल्याने अधिकच्या जागा मिळण्याची संधी शिवसेनेला प्राप्त झाली आहे आणि तशी बाकीच्या राज्यात भाजपने भूमिका घेतली तशीच भूमिका भाजप महाराष्ट्रात देखील घेणार. तसेच शिवसेना बीजेपीला विरोध दर्शवित असले तरी ते शेवटी एकत्रित होणार आणि युतीद्वारेच निवडणुकीला सामोरे जाणार हे स्पष्ट जाणवत आहे.

महाराष्ट्रात “त्यांना’ सोबत घेण्याचा प्रयत्न                                                                                    संपूर्ण देशात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच इतर पक्षांना बरोबर घेऊन निवडणुका लढविण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात 48 जागांपैकी 40 जागांवर एकमत झाले असून 8 जागांवरचा प्रश्‍न येत्या पाच ते सहा दिवसात मिटेल. तसेच महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना. कामगार संघटना यांना एकत्र आणून मार्ग काढून निवडणूक लढवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

आगामी निवडणुकीसाठी चेहरा समोर करणार नाही
आघाडी करताना कुठलाही चेहरा समोर करणार नाही. 2004 च्या निवडणुकीच्या वेळी देखील आम्ही कोणाचाही चेहरा समोर न ठेवता निवडणुका लढलो आणि नंतर बहुमत मिळाल्यानंतर मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली 10 वर्षे स्थिर सरकार चालवले. महाराष्ट्रात आज त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ते महाराष्ट्रातील जनतेला निवडणुकीच्या समोर जात असताना फसवणुकी सारखी भूमिका घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)