श्रीलंकेत पेट्रोलियम मंत्र्यांच्या अपहरणचा प्रयत्न

कोलंबो   श्रीलंकेचे पेट्रोलियम मंत्री अर्जुना रणतुंगा यांच्या अपहरणाचा रविवारी प्रयत्न झाला. पेट्रोलियम मंत्री अर्जुना रणतुंगा हे आपल्या सरकारी कार्यालयात शिरत असताना त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी त्यांच्या सुरक्षाकर्मीने केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाल असून तीन जण जखमी झाले आहेत. पोलीसांनी रणतुंगा यांच्या सुरक्षाकर्मीला अटक केले आहे. 

पेट्रोलियम मंत्र्यांच्या अपहरणाच्या प्रयत्नानंतर राजधानी कोलंबोमधील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. राष्ट्रपती सिरीसेना यांच्या समर्थकांनीच त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचे मीडियाने म्हटले आहे.

 राष्ट्रपती सिरिसेना यांनी पंतप्रधान रानील विक्रमसिंगे यांना बडतर्फ करून त्यांच्या जागी राजपक्षे यांची नियुक्ती केल्यानंतर श्रीलंकेतील राजकीय वातावरण ढवळून गेले आहे. लोकसभेत राजपक्षे आणि सिरिसेना यांचे मिळून 95 सदस्य आहेत, तर पंतप्रधान विक्रमसिंगे यांच्या यूएनपी पक्षाचे 106 सदस्य आहे, बहुमतासाठी विक्रमसिंगे यांना फक्त 7 जागांची आवश्‍यकता आहे. विक्रमसिंगे लोकसभेचे आपात्कालीन अधिवेशन भरवण्याच्या विचारात असतानाच सिरीसिंगे यांनी लोकसभा 15 नोव्हेंबरपर्यंत निलंबित केली आहे. लोकसभेच्या सभापतींनी विक्रमसिंगे हेच पंतप्रधान असल्याचे म्हटले आहे. 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)