चीन, कोरिया, रशियातून गुंतवणूक मिळविण्याचा प्रयत्न

संग्रहित छायाचित्र...

नवी दिल्ली – भारत सरकार येणाऱ्या काळात थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय) 100 अब्ज डॉलर्सपर्यंत मिळविण्याचे ध्येय ठेवणार आहे. त्यासाठी जपान, दक्षिण कोरिया, चीन आणि रशिया या ठिकाणी गुंतवणूक आकर्षीत करण्यासाठी विभाग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.

भारतात परदेशी गुंतवणूक करण्यात येणाऱ्या देशांना एक विश्वास प्राप्त व्हावा म्हणून अनेक प्रकारचे बदल करण्यात आले आहेत. सरकारने व्यापार क्षेत्रात कार्यक्षम वातावरण तयार केले आहे. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या उद्योग सुलभता अहवालानुसार भारताच्या उद्योग सुलभतेत 23 गुणांची सुधारणा होत भारताने 77 व्या स्थानांवर झेप घेतली असल्याची नोंद वर्ल्ड बॅंकेकडून करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उर्जा क्षेत्र, चिकित्सा उपकरण या क्षेत्रातही भारतात गुंतवणूक करण्यास मोठा वाव आहे. त्याकडे विदेशी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सरलेल्या वर्षात विदेशी गुंतवणूक आकर्षीत करण्यात भारताने चीनलाही मागे टाकले असल्याच्या बाबीकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधले. भारत गुंतवणूकीसाठी इतर देशापेक्षा आकर्षक असल्याचे जागतिक बाजारात वातावरण आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)