विद्यावेतनासाठी पुणे विद्यापीठाचे गेट बंद करण्याचा प्रयत्न

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागातील एम.फिल. व पीएच.डी. संशोधकांना पूर्वीप्रमाणेच सर्वांना विद्यावेतन मिळावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह विविध संघटनांनी शुक्रवारी विद्यापीठ बंदची हाक दिली होती. सकाळी विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार काही मिनिटे बंद करून विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.

पीएच.डी. व एम.फिल.च्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे विद्यावेतन देण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकताच जाहीर केला. या निर्णयास विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांनी विरोध दर्शविला आहे. यापूर्वी सरसकट सर्व पीएच.डी. व एम.फिल.च्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्यात येत होती. त्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना देण्यात यावे, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सरसकट विद्यावेतन मिळण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी उपोषणास बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने विविध विद्यार्थी संघटनांनी आज मुख्य प्रवेशद्वाराजवळ एकत्र आले आणि मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सर्व विभागांना बंदचे आवाहन केले. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी 2 दिवसांत याबाबत निर्णय न घेतल्यास येत्या सोमवारी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)