राममंदिर शक्‍य तितक्‍या लवकर उभारणीसाठी प्रयत्न 

नवी दिल्ली – राममंदिर निर्माणाची वाढती मागणी पाहता आता भाजपाचे राज्यसभेचे खासदार राकेश सिन्हा यांनी संसदेत खासगी विधेयक आणणार असल्याचे म्हटले आहे. या विषयावर आता अधिक वेळ घालविण्यात अर्थ नाही. त्यासाठी आपण हा पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

राकेश सिन्हा यांनी म्हटले की, विरोधक राममंदिर निर्मितीच्या तारखेवरून भाजपा आणि आरएसएसला वारंवार विचारणा करत टार्गेट करत आहेत. सुप्रीम कोर्टाला कलम 377, जलिकट्टू आणि शबरीमाला मंदिरावर निर्णय देण्यासाठी किती काळ लागला? अयोध्या प्रकरण प्राथमिकता राहिलेली नाही. पण हिंदूंमध्ये या मुद्द्याला नक्कीच प्राधान्य आहे. या घडामोडींवरून राम मंदिर निर्माण प्रकरण पुन्हा एकदा जोर धरू लागले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, राममंदिर-बाबरी मशीद जमिनीच्या वादाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने तीन महिने म्हणजेच जानेवारी 2019पर्यंत पुढे ढकलल्याने संघ परिवारातील सर्व संघटना संतापल्या असून, मंदिर लवकरात लवकर उभारण्यासाठी मोदी सरकारने आता वटहुकूम आणावा, अशी मागणी त्यांनी सुरू केली आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राममंदिराच्या उभारणीसाठी संत-महंत, विश्व हिंदू परिषद, तसेच गिरीराज सिंह यांच्यासारखे केंद्रीय मंत्री अतिशय आक्रमक झाले आहेत. कोणतीही वाट न पाहता 6 येत्या डिसेंबर रोजी राम मंदिराची उभारणी सुरू करू, सरकारने रोखून दाखवावे, असा थेट इशारा संत महंतांनी सरकारला दिला आहे. आता आम्ही थांबणारच नाही, असे म्हटले आहे. काही नेत्यांनी तर सर्वोच्च न्यायालय कॉंग्रेसच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने या विषयावरील सुनावणी टाळल्याने दुःख झाले. परंतु आम्ही सुख आणि दुःखात सोबत राहणारे लोक आहोत. साधू संत नेहमीच संयम बाळगतात. शेकडो वर्षांपासून संयम बाळगला आहे आणि थोडा काळ राखा. लवकरच काही चांगले घडणार असल्याचे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.सर्वोच्च न्यायालय शबरीमला मंदिरावर निर्णय देऊ शकते, मग राम मंदिरावर देखील निर्णय द्यावा. वेळीच मिळालेला न्याय उत्तम मानला जातो. न्यायाला होणारा विलंब एकप्रकारे अन्यायच ठरतो. न्यायातील विलंबामुळे लोकांना निराशा होत असल्याचे योगींनी म्हटले. देशाच्या न्यायपालिकेबद्दल सर्वांना आदर आहे. आम्ही देखील घटनात्मक बंधने पाळू. न्यायालयाने या प्रकरणाची जलद सुनावणी करून देशातील बंधुभाव आणि शांततेसाठी निर्णय दिला असता तर चांगले झाले असते.

 – योगी आदित्यनाथ 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)