विश्वास नांगरे-पाटील नाशिकचे नवे आयुक्त  

नाशिक – कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची बदली आता नाशिकला झाली आहे. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांचा कार्यकाळ मागील वर्षी सप्टेंबरमध्ये पूर्ण झाला असल्याने नवे आयुक्त म्हणून नांगरे-पाटील यांची निवड झाली आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंगल यांची बदली करण्यात आल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. औरंगाबाद महानिरीक्षकपदी डॉ. रवींद्र सिंगल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून प्रकाश मुत्याल यांचे नाव पुढे आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)