दर्शन न घेताच तृप्ती देसाई परतल्या 

शबरीमला प्रकरण : आंदोलकांनी विमानतळावरच रोखले 

कोची –
केरळमध्ये शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन तणाव वाढत आहे. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यासाठी आज केरळमध्ये दाखल झाल्या. मात्र, कोची विमानतळावरच त्यांना आंदोलकांनी रोखल्याने दर्शन न घेताच त्यांना माघारी परतावे लागले.

तृप्ती देसाई आपल्या सहका-यांसह आज पहाटे कोची विमानतळावर पोहचल्या. परंतु आंदोलकांनी त्यांना विमानतळाच्या बाहेर पडू दिले नाही. विमानतळाबाहेर मोठ्या संख्येने आंदोलक जमल्याने विमानतळ परिसरात तणाव वाढला होता.
कोची विमानतळाबाहेर सुमारे 50 कि.मी. अंतरापर्यत आंदोलकांनी निदर्शने केली. यात भाजप, संघ, अयप्पा धर्म सेनेचे कार्यकर्ते आणि भक्‍तगण सहभागी झाले होते.

यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तृप्ती देसाई यांना रोखणा-या 200 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, तणाव वाढल्याने पोलिसांनी तृप्ती देसाई यांना परत माघारी जाण्याची विनंती केली. त्यानंतर तृप्ती देसाई यांनी सायंकाळी साडेसहा वाजता परत येण्याचा निर्णय घेतला. यावेळी अयप्पा धर्म सेनेचे राहुल ईश्वर यांनी तृप्ती देसाई यांना मंदिरात न येण्याची धमकी दिली. ते म्हणाले, “”आम्ही जमिनीवर झोपू, विरोध करु. परंतु कोणत्याही परिस्थितीत देसाई यांना मंदिरात प्रवेश करु देणार नाही.”

दरम्यान, तृप्ती देसाई यांनी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर 16 ते 20 नोव्हेंबरदरम्यान शबरीमला मंदिरात प्रवेश करेन, असे सांगत मुख्यमंत्री विजयन यांना पत्र लिहिले होते. यात त्यांनी केरळमध्ये प्रवेश करण्यापासून ते परत घरी जाईपर्यंत सुरक्षा प्रदान करण्यात यावी, अशी मागणी केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)