ममतांवर टीका भोवली : अमित शहांना मानहानीची नोटीस 

कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील टीका भाजप अध्यक्ष अमित शहा यांना चांगलीच भोवली आहे. याप्रकरणी तृणमूल काँग्रेसने अमित शहा यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. यामध्ये अमित शहा यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी तृणमूलने केली आहे.

अमित शहा मंगळवारी पश्चिम बंगालमध्ये एका रॅलीला संबोधित करताना तृणमूल काँग्रेसवर कडाडून टीका केली होती. चिटफंड कंपन्यांच्या मालकांनी ममता बॅनर्जी यांच्या पेंटिंग कोट्यवधी रुपयांना खरेदी केल्या असल्याचा आरोप यावेळी अमित शहा यांनी केला. या आरोपाची गंभीर दखल तृणमूल काँग्रेसने घेतली असून ममतांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पक्षाचे वरिष्ठ नेते आणि आरोग्य मंत्री चंद्रीमा भट्टाचार्य यांनी म्हंटले आहे. तसेच शहा यांनी कशाच्या आधारावर आरोप केले? शहा यांनी जाहीर माफी मागावी, असे म्हणत चंद्रीमा भट्टाचार्य यांनी मानहानीची नोटीस बजावली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)