ट्रम्प यांच्या मुलाच्या भारत दौऱ्यावर 1 लाख डॉलर्सचा खर्च 

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे चिरंजीव ज्युनिअर ट्रम्प हे आपल्या व्यक्तीगत व्यावसायिक कारणासाठी भारतातील चार शहरांच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षा यंत्रणेवर तसेच सिक्रेट एजंटांच्या सेवेवर एक लाख डॉलर्स खर्च झाले आहेत अशी माहिती येथील काही माध्यमांनी दिली आहे.

ट्रम्प यांच्या कुटुंबियांचा बांधकाम व्यवसाय आहे आणि त्यांच्या कंपनीने भारतातही काही प्रकल्प राबवले आहेत. त्याच कामासाठी त्यांचे चिरंजीव मध्यंतरी भारतात येऊन गेले. त्यावेळी त्यांनी दिल्ली, मुंबई, पुणे आणि कोलकाता या शहरांना भेटी दिल्या होत्या. वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकाच्या पत्रकारांनी तेथील माहिती स्वातंत्र्य कायद्यानुसार होमलॅंड सिक्‍युरिटी विभागाकडून या दौऱ्याच्या खर्चाचा तपशील मागवला होता त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

-Ads-

ज्युनिअर ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्यावेळी झालेला हॉटेल खर्च, प्रवास खर्च आणि त्यांच्या सुरक्षेवर झालेला एकूण खर्च जवळपास एक लाख डॉलर्स इतका आहे. हा करदात्यांच्या पैशाचा अपव्यय आहे अशी टिका आता त्यांच्यावर तेथे होऊ लागली आहे. अमेरिकन अध्यक्षांच्या कुटुंबातील लोकांना सरकारी पैशाने सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते. त्यामुळे ट्रम्प यांच्या मुलाला भारतीय दौऱ्यातही ही सुरक्षा पुरवण्यात आली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)