भारताबरोबरचे संबंध दृढ करणाऱ्या विधेयकावर ट्रम्प यांची सही

वॉशिंग्टन (अमेरिका)- अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी भारताबरोबचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठीच्या विधेयकावर सोमवारी सही केली. हिंद-पॅसेफिक क्षेत्रात अमेरिकेचे नेतृत्व मजबूत करणे आणि भारताबरोबरचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठीचे हे विधेयक आहे. या विधेयकात चीन करत असलेल्या कारवाया या आंतरराष्ट्रीय व्यवस्था कमकुवत करणाऱ्या असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे.

ट्रम्प यांची सही झाल्यानंतर या विधेयकाचे आता कायद्यात रूपांतर झाले आहे. हिंद-पॅसेफिक क्षेत्रात शांती आणि सुरक्षा वाढवण्यासाठी भारताबरोबर महत्त्वपूर्ण रणनीतिक भागीदारीची यात व्यवस्था आहे. या कायद्याच्या कलम क्रमांक 204 नुसार भारत आणि अमेरिका यांच्यात कूटनीतिक, आर्थिक आणि संरक्षणविषयक संबंध अधिक मजबूत करण्यावर जोर देण्यात आलेला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हिंद-पॅसेफिक क्षेत्रात दक्षिण चीन सागर, हिंद महासागर आणि पश्‍चिममध्य पॅसेफिक महासागर यांचा समावेश होतो. एआरआयए (एशिया रिऍश्‍युरन्स इनिशिएटिव्ह ऍक्‍ट) 2018 नुसार भारताला प्रमुख सुरक्षा भागीदार बनवण्याबरोबरच संरक्षण व्यवसाय आणि तंत्रज्ञान भागीदारीचा उल्लेख आहे. सिनेटर कोरी गार्डनर आणि एड मार्के यांनी हे विधेयक संसदेत मांडले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)