चीन मधील कार उत्पादन थांबवण्याची ट्रम्प यांची जनरल मोटर्स कंपनीला सुचना 

वॉशिंग्टन: अमेरिकेतील प्रख्यात कार उत्पादक कंपनी असलेल्या जनरल मोटर्स कंपनीने आपले चीन मधील उत्त्पादन थांबवावे अशी सुचना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कंपनीला केली आहे. या कंपनीने आपल्या अमेरिका आणि कॅनडा येथील प्रकल्पांमधील 14 हजार 800 कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय अलिकडेच जाहीर केला होता. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हा आदेश दिला आहे.

कर्मचारी कपातीमुळे आमचा तब्बल साडे चार अब्ज डॉलर्सचा निधी वाचणार असल्याने आम्ही कामगार कपातीचा निर्णय घेतला असल्याचे जनरल मोटर्स कंपनीने म्हटले होते. त्यावर ट्रम्प यांनी तीव्र प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले की कंपनीने आपला कर्मचारी कपातीच्या निर्णयाचा तातडीने फेरविचार करावा. अन्यथा चीन मधील आपले उत्पादन थांबवावे. चीन मधील कंपनीचा प्रकल्प अमेरिकेतील ओहियो प्रांतात सुरू करण्याची सुचनाही ट्रम्प यांनी कंपनीच्या कार्यकारी प्रमुख मेरी बर्रा यांना केली आहे.

कर्मचारी कपातीचा कंपनीचा निर्णय आपल्याला आवडला नाही असे अध्यक्षांच्यावतीने कंपनीला अधिकृतपणेही कळवण्यात आले आहे. अमेरिकेने या कंपनीला खूप मदत केली आहे. आता त्यांनी कसलाही विचार न करता ओहियो प्रांतात आपला प्रकल्प त्वरीत सुरू करावा असे त्यांनी कंपनीला सुनावले आहे.कंपनीच्या उत्पादनांना आता फार प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रारही कंपनीने ट्रम्प यांच्याकडे केली त्यावेळी काही तरी वेगळे करा अशी सुचना ट्रम्प यांनी त्यांना केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
15 :thumbsup:
10 :heart:
0 :joy:
18 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)