तेलाच्या वाढत्या दरावरून ट्रम्प यांचा सौदीच्या राजांना इशारा 

आमच्या समर्थनाशिवाय सौदीचे राजे दोन आठवडेही टिकू शकत नाहीत 
दुबई: अमेरिका सौदी अरेबियाला लष्करी मदत करते. आम्ही त्यांची ही मदत थांबवली तर सौदीचे राजे दोन आठवडेही तेथे टिकू शकणार नाहीत असे विधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती वाढत आहेत. लवकरच त्या प्रति बॅरल शंभर डॉलर्सवर जाण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने सौदी अरेबिया आणि अन्य तेल उत्पादक देशांना तेलाचे उत्पादन वाढवून किंमती कमी करण्याची सुचना केली आहे. तथापी त्यांच्या सुचेवर सौदी अरेबियाने अजून अंमल केलेला नाही त्या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प यांनी सौदीच्या राजांना हा इशारा दिला आहे.
मिससीपी येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. सौदीचे राजे सलमान यांच्यावर आपले प्रेम आहे. आम्ही त्यांना लष्करी मदतही करीत आहोत. अमेरिका अनेक देशांना अशी लष्करी मदत करते पण हे देश तेलाच्या किंमती वाढवून अमेरिकेवरच कुरघोडी करतात असा नाराजी सूर काढतानाच ट्रम्प यांनी आम्ही सौदीच्या राजांना लष्करी मदत केली नाही तर ते तेथे दोन आठवडेही टिकू शकणार नाहीत असे त्यांनी म्हटले आहे. अमेरिका अनेक देशांना विनाकारणच लष्करी मदत देऊन आपल्यावरील खर्चाचा बोजा वाढवत आहे अशी टीका ट्रम्प यांनी आपल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारा काळात सातत्याने केली होती. आता पुन्हा ते त्याच लाईनवर परतले आहेत असे त्यांच्या विधानावरून स्पष्ट होत आहे.
सौदी अरेबियात अलसौद यांच्या राजघराण्याची राजवट असून त्यांना अमेरिकेचे लष्करी समर्थन आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्यांना अमेरिकेकडून असे संरक्षण मिळत आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की आम्ही सौदीला लष्करी मदत केली नाही तर त्यांना त्यांच्या लष्करावर मोठा खर्च करावा लागेल. हा खर्च आम्ही भागवतो म्हणून आमच्या तेलाच्या भावात तुम्ही कपात केली पाहिजे असा त्यांच्या म्हणण्याचा सूर दिसला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)